संग्रामसिंह पाटीलचे आयआयटी परीक्षेत यश
वार्ताहर/ कुर्ली
भाटनांगनूर येथील संग्रामसिंह विश्वनाथ पाटील याने जेईई ऍडव्हान्स परीक्षेत 1015 वा क्रमांक मिळवून आयआयटी या नामांकीत राष्ट्रीय संस्थेतील अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे. संग्रामसिंह याचे भाटनांगनूर येथील प्राथमिक मराठी शाळेत 5 वी पर्यंतचे शिक्षण झाले. सहावी ते दहावी त्याने नवोदय विद्यालय-कोथळी येथे पूर्ण केले. भाटनांगनूरसारख्या खेडेगावातून एका शेतकऱयाच्या मुलाने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला शिक्षक ए. एम. माने यांचे मार्गदर्शन लाभले.