जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या 69 : नव्याने 13 पॉझिटिव्ह आढळले : सत्तरपैकी आठ कोरोनामुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता झपाटय़ाने वाढत चालली आहे. सोमवारी आणखी 13 पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सिंधुदुर्गात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 69 पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या 13 रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील सहा, मालवण तालुक्यातील दोन, कुडाळ तालुक्यातील दोन आणि सावंतवाडी तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये एका 17 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. जिल्हय़ात गेल्या 15 दिवसांत 61 रुग्ण सापडले आहेत.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या देवगड तालुक्यातील वाडा येथील आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने आतापर्यंत आठ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण उपचारासाठी मुंबईमध्ये गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये 59 जण दाखल आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
कणकवली तालुक्यात सर्वाधिक सहा रुग्ण
जिल्हय़ात सोमवारी एकूण 133 कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले. पैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. नव्याने आढळलेल्या 13 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातून सर्वाधिक सहा रुग्ण सापडले आहेत. यात नाटळ येथील 36 वर्षीय एक तरुण, कुर्ली नवी वसाहत येथील 40 वर्षीय महिला आणि 21 वर्षीय युवक, कुरंगावणे येथील 29 वर्षीय तरुण आणि दीड वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. तसेच शेर्पे-खारेपाटण येथील 24 वर्षीय एका युवकाचा समावेश आहे. कणकवली तालुक्यात आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 29 एवढी झाली आहे.
सावंतवाडी तालुक्यात नव्याने तीन रुग्ण
सावंतवाडी तालुक्यात नव्याने कोरोना बाधित तीन रुग्ण आढळले असून निरवडे येथील 38 वर्षीय महिला आणि तिचीच सहा वर्षीय मुलगी या दोघांचा समावेश आहे. तर चौकुळ येथील 28 वर्षीय युवकाचा समावेश आहे. सावंतवाडी तालुक्यात आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या नऊ झाली आहे.
कुडाळ तालुक्यात दोन रुग्ण
कुडाळ तालुक्यामध्ये नव्याने कोरोना बाधित दोन रुग्ण आढळले असून आंब्रड येथील 21 वर्षीय युवक आणि गावराई येथील 34 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तालुक्यात आता एकूण रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
मालवण तालुक्यात दोन रुग्ण
मालवण तालुक्यामध्ये नव्याने दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून हिवाळे येथील 39 वर्षीय एक तरुण व 26 वर्षीय एका युवकाचा समावेश आहे. मालवण तालुक्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
असे आहेत कंटेनमेंट झोन
जिल्हय़ात सध्या कणकवली तालुक्मयातील शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण, नाटळ येथील हायस्कूलची दुमजली इमारत, वैभववाडी तालुक्मयातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबूबनगर, ब्राह्मणदेववाडी आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्मयातील कारिवडे, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, कुडाळ तालुक्मयातील पणदूर मयेकरवाडी, मालवण तालुक्मयातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी असे कंटेनमेंट झोन आहेत. सोमवारी नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांच्या अनुषंगाने कंटेनमेंट झोन तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.
27 हजार 831 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये
जिल्हय़ात एकूण 27 हजार 831 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 404 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. 26 हजार 175 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 252 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्हय़ात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
168 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 917 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 749 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 69 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 680 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 168 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 123 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 54 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पीटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये 24 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत सोमवारी 6 हजार 74 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांची संख्या 62 हजारावर
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात 2 मे 2020 पासून सोमवार अखेर एकूण 62 हजार 609 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
घरीच अलगीकरण 23887
संस्थात्मक अलगीकरण 27831
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 01917
अहवाल प्राप्त झालेले नमुने 01749
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 00069
निगेटिव्ह आलेले नमुने 01680
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 00168
विलगीकरण कक्षात दाखल 00123
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 00059
सोमवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 06074
कोरोना बाधित रुग्णांची तालुकानिहाय स्थिती
कणकवली 29
कुडाळ 9
सावंतवाडी 9
मालवण 8
देवगड 6
वैभववाडी 6
वेंगुर्ले 2