कंग्राळी खुर्द येथील विनायक अशोक बिर्जे याची सत्त्वपरीक्षा
गिरीष कल्लेद/ बेळगाव
सध्याच्या कोरोना पर्वामध्ये विद्यार्थी परीक्षेच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. मात्र, बेळगावचा सुपुत्र असणारा एक भावी कॅप्टन लंडन येथे या सत्त्वपरीक्षेच्या चक्रव्युहात अडकला आहे. त्यामुळे त्याच्या काळजीत कुटुंबीय आहेत. मुलगा ‘कॅप्टन’ क्हावा, असे आई-वडिलांचे स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने त्याचीही वाटचाल सुरू आहे. याचाच एक टप्पा असणाऱया नेव्ही (मर्चंट) चिफ ऑफीसरच्या परीक्षेची तयारी केली आहे. संकटांना तोंड देत वर्षभर अभ्यास केला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे परीक्षा लांबली, परीक्षा होईल का? हेही निश्चित नाही. यामुळे मायभूमित परतावे की परदेशातच राहावे अशा द्विधा मनस्थितीत तो सापडला आहे. कोविड-19 ने जणू त्याच्या जीवनाचीच परीक्षा घेतली आहे. कंग्राळी खुर्द येथील रहिवासी सुवर्णा व अशोक बिर्जे यांचा सुपुत्र विनायक सध्या लंडन येथे आहे. न्यू कॅस्टल सीटीमधील साऊथ टायनेसाईड कॉलेजमध्ये मर्चंट नेव्हीच्या चीफ ऑफिसर कोर्सच्या परीक्षेसाठी सर्व पूर्वतयारी आणि अभ्यास केला आहे. दि. 25 व 27 मार्चला परीक्षा होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. पुढील वेळापत्रक अद्यापही जाहीर करण्यात आले नाही. यामुळे परीक्षेबाबत अनिश्चितता असून विनायकची घालमेल वाढली आहे.
विनायकने लंडन येथेच सेकंड ऑफीसरची परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो 98 टक्के गुण घेऊन कॉलेजमध्ये दुसरा आला होता. चिफ ऑफीसरच्या अभ्यासक्रमाची परीक्षा देण्यासाठी मागील वषी जूनमध्ये तो लंडनला गेला आहे. वर्षभर अभ्यास आणि परीक्षेची आवश्यक पूर्वतयारी केली आहे. परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले होते. 25 व 27 मार्च रोजी परीक्षा होणार होती. या ठिकाणी 16 मार्च रोजी त्याची पत्नी सिद्धीला पुत्ररत्न झाले. यामुळे एकीकडे मुलगा झाल्याचा आनंद आहेच, यामुळे परीक्षा संपवून तो भारतात परतणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे परीक्षेबरोबरच त्याचा परतीचा प्रवासही लांबला आहे. त्याच्यासमोर अन्य पर्याय नसून सध्यातरी विमानसेवा बंद असल्याने तिथेच राहिला आहे. काही झाले तरी परीक्षा पूर्ण करूनच भारतात परतण्याचा त्याने निश्चय केला आहे.
कंग्राळी खुर्द येथे मध्यमवर्गीय कुटुंबातील असणाऱया विनायकने लहानपणीच मोठी स्वप्ने पाहिली होती. कष्टांना धैर्याने तोंड देत त्रास सहन करतच त्याची आजपर्यंतची वाटचाल सुरू आहे. आई-वडिलांच्या कष्टाची त्याला जाणीव आहे. यामुळे दुबई येथे आलेल्या कटु अनुभवाची विनायकने कल्पना दिली नव्हती. आताही लंडनमध्ये तो कोणत्या परिस्थितीत आहे हा विचार आम्हाला सतावत आहे, असे सुवर्णा बिर्जे यांनी सांगितले. तडजोड करण्याची त्याची सवय आहे. यामुळे अशा परिस्थितीतही तो खंबीरपणे राहील, अशा सदिच्छा त्यांनी तरुण भारतच्या माध्यमातून आपल्या मुलास दिल्या आहेत.
लंडनची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यामुळे परीक्षा आणखी लांबणीवर पडण्याचीही शक्मयता आहे. अशा परिस्थितीत त्याला धीर व प्रोत्साहन देण्याचे काम करत आहोत. जीवनातील अनेक कठीण प्रसंगांच्या परीक्षांना तो धैर्याने सामोरे गेला आहे. यामुळे या परीक्षेतही तो निश्चित उत्तीर्ण होईल, असा विश्वास वडील अशोक बिर्जे यांनी व्यक्त केला आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा
लॉकडाऊनमुळे राज्यातील दहावी परीक्षेबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारे नैराश्य निर्माण झाले आहे. याबाबत व्हीडिओ कॉलद्वारे विनायकशी संपर्क साधला असता… दहावीच्या विद्यार्थ्यांनी निराश न होता हा प्रसंग आव्हान म्हणून स्वीकारावा आणि पुढे येणाऱया परीक्षेला धैर्याने सामोरे जावे. खबरदारीच्यादृष्टीने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे परीक्षा ज्यावेळी होतील तोपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन विनायकने दहावीच्या विद्यार्थ्यांना केले आहे.
कॅप्टन नितीन धोंड यांचे मोलाचे मार्गदर्शन
विनायकने सेंट झेवियर्समधून दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांचा नेव्हीचा कोर्स पूर्ण केला. त्यावेळी कॅप्टन नितीन धोंड यांचे मार्गदर्शन व मोलाचा सल्ला त्याला मिळाला. यामुळे या टप्प्यापर्यंत मजल मारली असल्याचे अशोक बिर्जे यांनी सांगितले..