मुंबई
साखर उत्पादन करणाऱया कंपन्यांचे समभाग सध्या तेजीत असून बीएसईवर यांचे समभाग मंगळवारी 13 टक्के इतके उसळी घेताना दिसले. शेअर बाजारात दबाव असतानाही साखर उत्पादक कंपन्या मात्र तेजी राखत आहेत. यात उगार शुगर्सचा समभाग 13 टक्के वाढत 75 रुपयांवर तर श्री रेणुका शुगर्स, अवध शुगर अँड एनर्जी, उत्तम शुगर, दालमिया भारत शुगर, धामपूर शुगर, त्रिवेणी इंजिनियरिंग, द्वारकीश शुगर यांचे समभाग 2 ते 5 टक्के इतके वाढले होते.