धनाजीराव जाधव यांचे पुत्र संताजीराव जाधव समाधी स्वछता मोहीम
सातारा / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात असलेले मांडवे गावात सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे पुत्र संताजीराव जाधव यांची समाधी आहे. ही समाधी दुर्लक्षित होती. टीम दातेगडच्या मावळ्यांनी दि.9 सप्टेंबर रोजी या समाधीची स्वच्छता केली.
गेली कित्येक दिवस सोशल मीडियावर संताजी जाधव समाधी संवर्धनाबद्दल पोस्ट फिरत होत्या. पण त्या समाधीचं संवर्धन काही होत नव्हतं. हे काम टीम दातेगडने हाती घेतल आणि पूर्णसुद्धा केलं.
सातारा तालुक्यात असलेले मांडवे गावात सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे पुत्र संताजीराव जाधव यांची समाधी आहे. समाधीभोवती झाडांनी, वेलींनी विळखा घातला होता. त्यामुळे समाधी दुर्लक्षित झाली होती. गावातील लोकांना समाधीबद्दल फारशी अशी माहिती नव्हती. टीमने गावातील त्यांच्या वंशज यांची भेट घेऊन समाधी स्वछता मोहिमेस परवानगी घेऊन.गावातील तरुण मुलांना संघटित करून बुधवार दि ९ सप्टेंबर २०२० रोजी समाधी स्वछता मोहीम पार पडली. या मोहिमेत समाधी भोवती झाडांचा वेलींचा पडलेला विळखा साफ करून समाधी स्वच्छ पाण्याने धुवून पूजा करण्यात आली. समाधी स्वछता मोहिमेसाठी जाधवराव घराण्यातील वंशज आणि स्थानिक लोकांनी सहकार्य केले.