खासदार उदयनराजे यांनी पत्रकारांनाच केला प्रतिसवाल
ईडीच्या नोटीसीवरुन म्हणले,दोरीत घ्या सगळ्यांना, सभेला न बसताच उदयनराजें पडले बाहेर
प्रतिनिधी / सातारा
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार उत्तम चाललेला आहे. देशात बँकेचे नाव होत आहे. अनेक जिल्हा बँका मोडकळीत निघाल्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही आदर्श बँक आहे. या बँकेची निवडणूकीशी माझा काय संबंध?, निवडणूकीकरता एवढे पैसे जपले तर शेतकरी सभासदांचे कोटकल्याण होईल. निवडणूक लावायची की नाही याचा निर्णय संचालक मंडळच घेईल, असा प्रतिसवालच खासदार उदयनराजेंनी पत्रकारांना केला.
दरम्यान, ईडीच्या नोटीसीबाबत छेडलेल्या प्रश्नांवरुन ईडीची नोटीस कोणाला पाठवायची, कोणाला नाही पाठवायचे हे ईड ठरवले. ज्यांना नोटीस पाठवली त्या सर्वांना दोरीत घ्या, त्याचे काय झाले असाही सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सर्वसाधारण सभा होती. त्या सभेपूर्वी खासदार उदयनराजे हे जिल्हा बँकेत आले होते. मात्र, सभेला न बसताच ते परत फिरले. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी बातचित केली. त्यावेळी ते म्हणाले, जिल्हा बँक सरकाळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली व आमदारांच्या मार्गदर्शनखाली चांगले काम करत आहे. राज्यात चांगली बँक आहे. एक आदर्श बँक आहे. मला काय बँकेतून कोणत कर्ज काढायचे नाही. फक्त बँकेने कामगारांचे पगार द्यावेत ते करतातच आहेत. केलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
ईडीने नोटीस पाठवलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांवर ते म्हणाले, इडीने नोटीस कोणाला नोटीस पाठवायची, कोणाला नाही पाठवायची हे ते ठरवणार. ज्यांना नोटीस पाठवली त्या सर्वांचे इकडून तिकडे असे दोरीत घ्या. त्यांच पुढे काय झाले असे सांगत मी ज्यात नाही स्वॉरी टु से असे खोचक उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणूकीबाबत छेडले असता निवडणूकीचा माझा काय संबंध नाही. काय करायचं निवडणूक घ्यायची का?, बँकेचे एवढे पैसे जपले तर शेतकरी सभासदांचे कोटकल्याण होईल. निवडणूक लावू नये हे संचालक मंडळ ठरवेल, असा प्रतिप्रश्नच पत्रकारांना त्यांनी केला.
सभेपूर्वीच वॉकआऊट
जिल्हा बँकेच्या सभेत्त विरोधक म्हणून जयकुमार गोरे असतील वा खासदार उदयनराजे हेच समजले जातात. ते सभेच्या निमित्ताने बँकेत आले खरे पण सभा सुरु होण्यापूर्वीच त्यांनी वॉकआऊट केले. त्यामुळे येणाऱ्या बँकेच्या निवडणूकीत ते बोलतील एक आणि करतील एक. त्यांची स्टाईल ही आजपर्यंत कोणाला सापडली नाही.