वार्ताहर / सावंतवाडी:
श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग या संस्थेच्या संस्थापिका तथा संगीत शिक्षिका सौ. वीणा दळवी यांनी संगीत अलंकार परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. ज्येष्ठ गायक पंडित दीनकर पणशीकर आणि बेळगाव येथील ज्येष्ठ गायिका डॉ. स्नेहा राजुरीकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
सौ. वीणा दळवी या होडावडे गावच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून अतिशय मेहनतीने विवाहानंतरही आपले संगीत शिक्षण सुरू ठेवून त्यांनी हे यश मिळवले. सावंतवाडी येथील श्री सद्गुरु संगीत विद्यालयातून गुरुवर्य नीलेश मेस्त्राr यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विशारद झाल्यानंतर त्यांनी श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापना केली. सिंधुदुर्गात सर्वप्रथमच ‘शास्त्राrय ख्याल गायन स्पर्धा’ आयोजित करून त्यांनी यशस्वी केली. संगीत अलंकार परीक्षेत मिळवलेल्या त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.