उदय शिंदे सातारा तालुका शिक्षक समिती मार्फत शिक्षकांसाठी ऑक्सिजन मशिन्ससह उपचार साहित्य भेट
सातारा / प्रतिनिधी
सातारा तालुका शिक्षक समितीच्या वतीने ४ ऑक्सिजन मशीन शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिल्या.त्याचा उद्घाटन सोहळा राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या हस्ते शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव यांच्या उपस्थितीत शिक्षक भवन सातारा याठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात कै. बाळकृष्ण बागल व कै.राहुल सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी सनिटायझर बॉटल्स, ऑक्सीजन लेवल चेक करण्याच्या ऑक्सिमीटर मशिन्स, ताप चेक करण्याच्या गन सातारा तालुक्यात विभागवार उपलब्ध करून देण्यात आल्या.यासाठी सातारा तालुक्यातील शिक्षक समितीच्या सभासदांच्या वतीने एक लाख ऐंशी हजार रुपये निधी जमा झाला.यासाठी सातारा तालुका शिक्षक समितीचे विद्यमान अध्यक्ष अनिल चव्हाण व त्यांची संपूर्ण कार्यकारणी तसेच शिक्षक समितीचे सर्व सभासद यांनी विशेष कष्ट घेतले. सातारा तालुका शिक्षक समितीच्या या सामाजिक बांधिलकी बद्दल व स्तुत्य उपक्रमाबद्दल राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी आपल्या मनोगतात कौतुक केले.
शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव यांनी मशीन बद्दल माहिती देऊन ती कशी जोडावी याचा डेमो दाखविला.
याप्रसंगी अनिल कांबळे संचालक कराड पाटण शिक्षक सोसायटी केंद्रप्रमुख रमेश लोटेकर, रामचंद्र गायकवाड, भूरकुंडे, सातपुते व शिक्षक लक्ष्मण ढाणे, राजेंद्र शेलार, धनंजय ढाणे, किशोर ढाणे, अनिल अशोक चव्हाण, तानाजी सराटे, बंडु थोरात, संजय काटाळे, संतोष लोहार, राजेंद्र बोबडे, प्रवीण क्षीरसागर, सातारा तालुक्यातील शिक्षक समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.