सातारा / प्रतिनिधी :
संगम माहुली फाटा येथे कोरेगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो गाडीने तीन दुचाकींना उडवल्याची घटना घडली. यामध्ये तीन दुचाकीवरील चार जण जखमी झाले असून, दुचाकींचे नुकसान झाले आहे.
संगम माहुली येथील फाट्यावर शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव कडून आलेल्या भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो जीपने ओव्हर टेक करण्याच्या नादात तीन दुचाकींना उडवले. त्यात एका दुचाकीवरील युवकाच्या पायाला लागले, दुसऱ्या दुसऱ्या दुचाकीवरील व्यक्तीच्या तोंडातून फेस येत बेशुद्ध पडला होता, तर तिसऱ्या दुचाकीवर एक महिला आणि एक पुरुष किरकोळ जखमी झाला.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.बोलेरोचा चालकास संगम माहुली पोलीस चौकीच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.