प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरातील लेले हॉस्पिटल ते फडके हॉस्पिटल या मार्गावर स्थानिक नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या सततचा पाठपुराव्यानंतर महावितरणने हाय व्होल्टेज अंडरग्राऊंड लाईन टाकल्याने येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या दूर झाली आहे. परिणामी, या रस्त्यावर राहणाया आणि आजुबाजूच्या परिसरातील शेकडो कुटुंबांवरील हायटेन्शन लाईनची टांगती तलवार आता कायमची दूर झाली आहे. दरम्यान, सातारा विकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार उदयनराजे भोसले यांनी ही यामध्ये मोलाची भूमिका बाजावली असल्याचे नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.
सातारा येथील मंगळवार पेठेतील लेले हॉस्पिटल ते फडके हॉस्पिटल या मार्गावर अनेक उंच इमारती तसेच अपार्टमेंट आहेत. येथे राहणारे स्थानिक आणि भाडेकरुंची संख्या शेकडोंच्या घरात आहे. त्यातच या मार्गावर असणाया इमारतीवरून महावितरणची 22 केव्ही व्होल्टेज हायटेन्शन लाईन गेली असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. या भागात दुस्रया व तिस्रया मजल्यावर राहणाया लोकांना तर जीव मुठीत धरून राहावे लागत होते. शॉक लागण्याच्या मोठा धोका निर्माण झाला होता. पावसाळ्यात तर येथे बिकट परिस्थिती असायची. अनेकांना शॉक लागल्याच्या तक्रारी होत्या. काही ठिकाणी शॉर्टसर्किटही झाले होते.
दरम्यान, या परिसरात राहणाया नागरिकांनी आपली ही समस्या स्थानिक नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या कानावर घातली होती. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी काय करता येईल, या अनुषंगाने त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने, शाखा अभियंता जितेंद्र पाटील तसेच अन्य अधिकायांशी ही चर्चा केली आणि या मार्गावर अंडरग्राउंड लाईन टाकून ती कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ते काम सुरू करण्यात आले आणि काही दिवसांतच ते पूर्णही झाले. दरम्यान, अंडरग्राऊंड लाईन टाकल्याने आता येथील लोक टेन्शन फ्री झाले आहेत.