प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक वाचनालय बेळगाव संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी गोविंदराव राऊत, उपाध्यक्षपदी अनंत लाड, मानद कार्यवाहपदी सुनीता मोहिते व सहकार्यवाहपदी प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीचा ठराव तत्कालीन कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी मांडला. त्यास कार्यकारी सदस्य अभय याळगी यांनी अनुमोदन दिले.
तत्कालीन अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सदर निवड एकमताने करण्यात आली. यावेळी तत्कालीन अध्यक्षांनी नूतन पदाधिकाऱयांना संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या कार्याचा आढावा घेतला व आभार मानले. यावेळी कार्यकारी सदस्य ऍड. आय. जी. मुचंडी, अनंत जांगळे, लता पाटील, प्रसन्न हेरेकर, संतोष नलवडे व प्रताप पाटील उपस्थित होते.