दोडामार्ग – वार्ताहर-
मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पने अंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत 10 सायकलीं चे वाटप करण्यात आले. या सायकली दोडामार्ग इंग्लिश स्कुल दोडामार्ग मधील 10 विद्यार्थिनींना देण्यात आल्या.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी. डी. तळेकर, दोडामार्गचे माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण,भाजपचे तालुकाध्यक्ष प्रविण गवस, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, तसेच प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.