मुंबई –
सोनी या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपला नवा 55 इंची ब्रेव्हीया एक्स 90 जे अल्ट्रा एचडी एचडीआर एलइडी टीव्ही भारतात लाँच केला आहे. मानवी मेंदुप्रमाणे विचार करणाऱया या अनोख्या नव्या टीव्हीची किंमत 1 लाख 39 हजार रुपये असणार आहे. सदरचा स्मार्ट टीव्ही सोनीच्या विक्री क्रेंदांवर तर उपलब्ध असणार आहेच पण इकॉमर्स पोर्टलवरही तो खरेदी करता येणार आहे. येणाऱया काळात सोनी 65 इंची आणि 74 इंची प्रकारातील टीव्हीही सादर करणार आहे.