प्रतिनिधी / सोलापूर
खत वाटपसाठी शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीचा अंमलबजावणी न करता ठराविक शेतकऱ्यांना प्रमाणापेक्षा जास्त विक्री करणे खत विक्री करताना एकाच आधार कार्डवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खताचे वाटप करण्याचा शासनाने ठरवून दिलेल्या खत व्यवस्थापनात कुचराई केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील 21 कृषी सेवा केंद्राचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.
पंधरा कृषी सेवा केंद्र चालकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. खरिपातील खत वाटपात कृषी केंद्र चालकांनी हे कुचराई केली होती.
ऑगस्ट ,सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात युरीया खरेदी केलेला आहे अशा कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली होती. युरिया हे अनुदानित खत आहे शेतकऱ्यांना एका पोत्याला 266 रुपये घेतले जातात परंतु त्याची किंमत 1200 रुपये आहे. यामधील तफावत आहे.ती अनुदानाच्या स्वरूपात केंद्रशासन संबंधित कंपन्यांना देते त्यामुळे युरिया हे खत पॉस मशीन द्वारे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी कोरोनाचे कारण देऊन तसेच शेतकरी आधार कार्ड आणत नाही असे कारण देऊन पोस मशीनवर तो नोंदवला नव्हता. अनेक शेतकऱ्यांना दिलेला युरिया एकाच शेतकऱ्यांच्या नावावर दाखवण्याचा प्रकार निदर्शनास आला होता. याबाबत तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांना तपासणीचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेमार्फत मार्फत देण्यात आले होते. ज्या ठिकाणी पोस मशीनचे वापरामध्ये त्रुटी आढळल्या आहेत अशा सर्व कृषी सेवा केंद्रांची सुनावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात घेण्यात आली होती. त्यानुसार ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील एकूण 51 कृषी सेवा केंद्र पैकी 21 कृषी सेवा केंद्रांची परवाना निलंबित करण्यात आला असून 15 कृषी सेवा केंद्रांना पोसच्या वापरातील त्रुटींमुळे सक्त ताकीद देण्यात आली आहे.
सदरची तपासणी यापुढे दर महिन्याला होणार असून यामध्ये वारंवार सांगूनही चुका होत असतील तर संबंधित कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनीही अनुदानित खते खरेदी करताना आपले आधार कार्ड सोबत घेऊन जावे असे आवाहनही त्यांनी केले शिवाय कोणतीही अनुदानित खत यापुढे आधारकार्डशिवाय मिळणार नसल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.