प्रतिनिधी/ सातारा
सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या 20 दिवसांपासून लसीचा पहिला डोस उपलब्ध झालेला नाही. कंपनीत उत्पादन नसल्याने पहिला डोस आला नसल्याची माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.
जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे. कोविशिल्ड, कोव्हॉक्सीन नंतर रशियाची स्पुटनिक व्ही लस ही जिह्यात नागरिकांना देण्यात येत आहे. मात्र गेल्या 20 दिवसापासून ही लस उत्पादन करणाऱया कंपनीत पहिला डोसचे उत्पादन करण्यात आलेले नाही. यामुळे या लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिह्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही ची लस मिळत आहे. या लसीची किंमत 1 हजार 145 रूपये इतकी आहे. आतापर्यंत 2 हजार 392 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 1 हजार 276 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांनाच दुसरा डोस देण्यात येत आहे. स्पुटनिक लसीचा पहिला डोस ज्या नागरिकांना घ्यायचा आहे. त्यांना तुटवडा निर्माण झाल्याने डोस देता येत नसल्याची माहिती हॉस्पिटल कडून देण्यात आली आहे.