ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या काळात सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हरयाणा सरकार ने मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, हरयाणा सरकार सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार देणार आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. काल खट्टर यांनी डॉक्टर, इंडियन मेडिकल, असोसिएशन चे प्रतिनिधी, वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची बैठक घेतली.
त्यानंतर बोलताना खट्टर म्हणाले, हरयाणातील वैद्यकीय व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार देण्यात येईल. याचा लाभ कोरोनाशी लढणारे डॉक्टर, नर्स, चतुर्थ श्रेणी कामगार, रुग्णवाहिका चालक यांना मिळणार आहे. तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत या कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन देण्यात येईल असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.