एकोशी येथे गणेश विसर्जन स्थळी विद्युत रोषणाई व ट्रान्सफॉरमरचे उद्घाटन
प्रतिनिधी /म्हापसा
सुमारे 50 लाख रुपये खर्चून येथे काम हाती घेण्यात आले आहे. या भागात विसर्जनावेळी वीज उपकरणे व ट्रान्स्फॉरमरची आवश्यकता होती शिवाय येथे शेड घालण्याची मागणीही पूर्णत्वाकडे आली आहे. सुमारे 420 कोटी रुपये खर्चून हळदोणा मतदारसंघात भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे कामही हाती घेण्यात आले असल्याची माहिती यावेळी आमदार ग्लेन टिकलो सौझा यांनी दिली. एकोशी गावात गणपती विसर्जन रॅम्प तसेच ट्रान्सफॉर्मर घालून सुशोभीकरण कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी सरपंच प्रितोश नागेशकर, माजी सरपंच प्रभाकर हळदणकर, भरत फडते, गोमलीन डिसौजा, सहाय्यक अभियंता रामदास सालेलकर, राजीव कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या भागात वीज पुरवठा खंडीत होत होता. 100 केव्ही एकोशीत ट्रान्स्फॉरमरची आवश्यकता होती. सरपंच प्रितेश नागेशकर यांचे खूप सहकार्य लाभले. गावातील नागरिकांनी याकामी आम्हाला खूप सहकार्य केल्याने आम्ही ही कामे करू शकलो अशी माहिती आमदार ग्लेन टिकलो यांनी दिली.
सर्वांच्या पाठिंब्याने पुन्हा विजयी होणार
सुमारे 39 लाखाची कामे एकोशीत हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत व वीज मंत्री काब्राल यांनी येथे सहकार्य केले. ऐन चतुर्थीच्या दिवसात येथे सर्वत्र वीज रोषणाई करण्यात आली. येथे उत्कृष्ट दर्जाचे चक्का टाईल्स घालण्यात येईल. येथील रवळनाथ देवस्थान येथे शेड उभारण्याचे काम पूर्ण केले. येथील शेड, विद्युत रोषणाई आदी मिळून सुमारे 50 लाखांचे काम हाती घेण्यात आले आहे. 33 केव्ही थिवी ते नास्नोळा भूमीगत वीज वाहिन्या घातल्या आहे. 420 कोटी निविदा हळदोणा मतदारसंघात भूमीगत वीज वाहिन्यासाठी काणढय़ात आली असून ही मंजूर करून या भागातील 90 टक्के काम त्वरित पूर्णत्वाकडे नेण्यात येईल अशी माहिती आमदार ग्लेन टिकलो यांनी दिली.
भूमीगत वीज वाहिन्या देणारे एकोशी पहिले गाव- सरपंच नागेशकर
सरपंच प्रितेश नागेशकर आमगार टिकलोच्या सहाय्याने येथे ट्रान्सफॉरमरचे उद्घाटन झाले. गणपती विसर्जन व येथे शेड उभारून दिली. आमदार काम करतात म्हणून आम्हाला गावचा विकास पहायला मिळतो. येथील जमीन मालकानेही आम्हाला ट्रान्सफॉरमरसाठी जागा मिळवून दिली. त्यांचेही आभार मानावे तितके कमीच आहेत असे ते म्हणाले.
रस्ते, वीज कामासाठी आमदार टिकलोचे पूर्ण सहकार्य- भरत फडते
माजी सरपंच भरत फडते म्हणाले की, येथे खूप कामे होती ती पूर्णत्वाकडे येत आहे. आमदार टिकलो यांच्या सहकार्याने वरिष्ठ अधिकाऱयांसमवेत स्मशानभूमीकडे ट्रान्सफॉरमर घातला. वीज खात्याच्या अधिकाऱयांनी भर पावसात काम करून दिले. मंडपामागे रापचे उद्घाटन करण्यात आले. येथे गणपती विसर्जन करण्यास त्रास होत होता. रस्ता फोडल्यावर ग्रामस्थांना खूप त्रास झाला. मात्र सर्वांच्या सहकार्याने आमदार टिकलो यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वाकडे आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माहिती देताना सहाय्यक अभियंता रामदास सालेलकर म्हणाले की, येथे झाडे झुडपे खूप आहेत मात्र वीजसाठी ही झाडे कापणे आमच्या हातात नाही. कंत्राटदाराला हे काम करण्यास उशीर लागला. त्यांना या कामात नुकसानही झाले मात्र त्यांनी हे काम करून दिले अशी माहिती त्यांनी दिली.