विर्डी भाजप समिती चे आव्हान
सांखळी /प्रतिनिधी
सांखळी शहरातील नगर पालिका क्षेत्रातील विर्डी गावातील प्रभाग 13 चे विद्यमान नगरसेवक राजेश सावळ यांनी भाजपच्या जोरावर निवडणूक जिंकली होती आणि आता भाजप विरोधात बोलत आहे त्यांनी हिंमत असेलतर नगर सेवक पदाचा राजीनामा देऊन पुंन्हा निवडून येऊन दाखवावे असा इशारा स्थानिक भाजप समिती सदस्यांनी दिला आहे
आज संध्याकाळी भाजप कार्यालयात समिती ची पत्रकार परिषद झाली यात मिलिंद नाईक,,श्रीरंग सावळ, अर्जून कामत,भालचंद्र परब, दामोदर नाईक यांचीं उपस्थिती होती या वेळी सावळ यांनी स्वतः चुका केल्या आणि नाहक मुख्यमंत्र्यांचे नाहक नाव बदनाम करत आहे, स्थनिक आमदार मुळेच ते राजकारणात आले त्या वेळी भाजप कार्यकार्य त्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य केले होते, त्याच्या विरोधात जे खटले आहेत ते पूर्णपणे खाजगी स्वरूपाचे असून भाजपचे त्यात काही देणेघेणे नाही तेव्हा त्यांनी उगाच भाजपला दोष देऊनये असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आहे