ओडिशात निवृत्त रेल्वे अधिकाऱयाच्या मालमत्तेवर सीबीआयचा छापा
भुवनेश्वर
ओडिशामध्ये सीबीआयने मंगळवारी एका निवृत्त रेल्वे अधिकाऱयाच्या घरावर छापा टाकला. या कारवाईमध्ये भुवनेश्वरमधून 1.57 कोटींच्या रोख रकमेसह 17 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. 17 किलो सोन्याच्या दागिन्यांची किंमत जवळपास 8 कोटी रुपये इतकी होत आहे. प्रमोद कुमार जैना नामक निवृत्त रेल्वे अधिकाऱयाच्या मालमत्तेवर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेत अनेक ठिकाणच्या मालमत्तांची कागदपत्रेही सापडली आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून त्यांच्या निकटवर्तियांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्रमोद जैना यांच्याकडून 59.09 टक्के बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.