माजी सीईओ गोपिनाथनना मिळाले 30 कोटी : सर्वात मोठी आयटी कंपनी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टीसीएसच्या सीईआंsच्या वेतनात गेल्या 3 वर्षात 120 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे माजी सीईओ राजेश गोपिनाथन यांनी मागच्या आर्थिक वर्षात अंदाजे 30 कोटी रुपये वेतनरुपात घेतले होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा वार्षिक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून त्यात वरील बाब नमूद करण्यात आल्याचे कळते. आयटी कंपनीच्या बॉसना गेल्या 3 वर्षात पाहता 120 टक्के अधिक वेतनात वाढ मिळाली आहे. महसूल प्राप्ती आणि बाजार भांडवलाच्याबाबतीत पाहता टीसीएस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असून टीसीएसचे माजी सीईओ राजेश गोपिनाथन यांना मागच्या वर्षी 30 कोटी रुपये वेतनरुपी मिळाले आहेत. याआधीच्या वर्षात त्यांना वेतनरुपात 25.76 कोटी रुपये मिळाले होते. त्यांना इतर लाभ भत्तेरुपात 2.43 कोटी व कमिशनरुपात 25 कोटी रुपये मिळतात.
अधिकाऱ्यांची कमाई
2017 पासून ते टीसीएसच्या सीईओ पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. टीसीएसच्या अधिकाऱ्यांना वेतनात चांगली कमाई करता येत आहे. आघाडीवरच्या अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनात इतर लाभ, भत्ते आणि कमिशनचा वाटाही लक्षणीय असतो. आर्थिक वर्षात होणाऱ्या नफ्यानुसार सीईओंच्या वेतनात वाढ-कपात कंपनीकडून होत असते.
7 वर्षात वेतन चारपट
21 फेब्रुवारी 2017 रोजी 5 वर्षासाठी राजेश गोपिनाथन यांची नियुक्ती करण्यात आली होती. 7 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या वेतनात पाहता जवळपास चारपट वाढ नेंदली गेली आहे.
इतर आयटी कंपन्यांमध्ये वेतन तगडे
तसं पाहता इतर आयटी कंपन्यांच्या तुलनेत टीसीएसमध्ये मिळणारं वेतन हे कमीच मानलं जातं. एचसीएल टेकचे सीईओ विजय कुमार यांनी 2022 आर्थिक वर्षी 130 कोटी रुपये वेतन म्हणून घेतले होते. तर विप्रोचे के टी डेलापोर्ट यांना 80 कोटी रुपये, इन्फोसिसचे सलील पारेख 71 कोटी आणि टेक महिंद्राचे गुरनानी यांना 63 कोटी रुपये वेतनाखातर मिळाले हेते.