ऑनलाईन टीम/तरुण भारत
अमेरिकेचा (America) शेजारी देश मेक्सिकोमध्ये (Mexico) अज्ञाकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे. या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाल्याचेही समजते. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल हल्लेखोरांना गोळीबार करूनच प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, आता मेक्सिकोनंतर थायलंडच्या (Thailand) ईशान्येकडील प्रांतात बालसंगोपन केंद्रात माजी पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २२ चिमुरड्यांसह ३४ जणांचा मृत्यू झाला.
पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार नॉन्ग बुआ-लुम्फू येथील बालसंगोपन केंद्रात हा रक्तपात घडला. गोळीबार करणारा माथेफिरू माजी पोलीस अधिकारी होता. या अंदाधूंद गोळीबारानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पोलीस उपप्रवक्ते अर्कोन क्रेटोंग यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली असून आतापर्यंत तब्बल चिमुरड्यांसह ३४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
हे ही वाचा : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक
पन्या कामराब असे या हल्लेखोर माजी पोलीस नाव आहे. मादक पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याच्या कारणावरून थायलंड पोलिसांनी त्याला सेवेतून बडतर्फ केले होते. त्यामुळे पोलिस गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेत हो