जॉन नाझारेथ यांचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकारच्या विधीमंडळ सचिवालयात नियमबाहय़ पद्धतीने चार कक्ष अधिकाऱयांची भरती करण्याचा सरकारने प्रयत्न केल्यास प्रसंगी आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाने दिला आहे. एप्रिल महिन्यात विधीमंडळ सचिवालयातील चार कक्ष अधिकाऱयांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली. त्यानंतर ती जाहिरात मागे घेण्यात आली. सत्ताधारी भाजपकडून आपले काही उमेदवार त्या पदावर नेमण्यासाठी नियमामध्ये दुरूस्ती करण्यात येत आहे. सरकारने आपल्या मर्जीतील उमेदवार तेथे नेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कर्मचारी विभागाचे निमंत्रक जॉन नाझारेथ यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला. 28 एप्रिल रोजी विधीमंडळ सचिवालयातील चार कक्ष अधिकाऱयांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. यापैकी तीन जागा अनारक्षित ठेवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱया दिवशी ती जाहिरात मागे घेण्यात आली. त्यानंतर 29 एप्रिल रोजी विधीमंडळ सचिवालयाकडून जाहिरात मागे घेण्याचे जाहीर केले. जाहिरात देऊन ती पुन्हा मागे घेणे ही प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने या विषयावर आम्ही माहिती घेतल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून आपले काही उमेदवार त्या पदावर नेमण्यासाठी नियमामध्ये दुरूस्ती करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असे जॉन नाझारेथ यांनी सांगितले. सरकारने आपल्या मर्जीतील उमेदवार तेथे नेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू. यापूर्वीही सरकारने नियमबाहय़ पद्धतीने केलेल्या कामांना आम्ही न्यायालयात जाऊन विरोध केला आहे आणि सरकारला नियमांचे पालन करण्यास भाग पाडले आहे असे नाझारेथ म्हणाले.