वार्ताहर / पुलाची शिरोली
शिरोली औद्योगिक क्षेत्रातील पूरग्रस्त उद्योगांचे पंचनामे करण्यासंदर्भात हातकणंगले तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना सूचना देण्यात येतील अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. तसेच शिये, शिरोली परिसरातील महापूरामुळे नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रांताधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार शीतल मुळे-भांबुरे यांना दिल्या.
शिये येथील पंचागंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शियेतील हनुमान नगर मधील पुरग्रस्त बांधव आणि शेतकऱ्यांशी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संवाद साधला. ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी पाटील यांनी परिसरातील ऊस पिकांचे झालेल्या नुकसानी संदर्भात माहिती दिली. तसेच औद्योगिक वसाहतीत काही उद्योगातील मशिनरींचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, उद्योजक सरदार जाधव, महादेव जाधव, सुदर्शन गाडवे, रमेश तासगावकर, अमर जाधव, पांडुरंग गाडवे, आनंद कांबळे, रमेश इंगवले, बापू पाटील, अमोल मोरे, गंगाराम कांबळे, नामदेव जाधव, दिनेश तासगावकर, आप्पा गवंडी, शोभा गाडवे, शुभांगी इंगवले, यशोदा पाटील, रवींद्र अतिग्रे, राजू मोरे, अलताफ मुजावर, रमेश गाडवे, उमेश गाडवे, आदी उपस्थिती होते.