क्षेत्रपाल मंदिर बांधकामासाठी सहकार्याची ग्वाही
ओटवणे / प्रतिनिधी:
केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी आंबेगावला सदिच्छा भेट दिली. यावेळी गावचे ग्रामदैवत श्री देव लिंग क्षेत्रपालचे दर्शन घेउन मंदिराचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंबेगावच्यावतीने देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परब यांच्याहस्ते केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून गावातील लोकांना आरोग्य सेवा देणारे आंबेगाबातील डॉ शंकर राऊळ यांचा केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, नामदेव परब, राजन मडवळ, बाबुराव सावंत, न्हानू परब, सुकाजी तेली, सुरेश परब, तुकाराम राऊळ, प्रकाश केळुसकर, जनार्दन जंगले, प्रभाकर गावडे, संतोष राणे, अशोक गावडे, शशिकांत परब, अण्णा केळुसकर, योगेश गवळी, प्रियांका आंगचेकर, सुवर्णा परब, सखाराम कुंभार, बाळा शिंदे, विलास राणे, बाळा तेली, कृष्णा कुंभार, रामदास नाईक, कृष्णा जाधव, विष्णू जाधव, केशव मुळीक, रामा बहादूर, लक्ष्मण कुंभार, कृष्णा मेस्त्री, भिवाजी नाईक देवस्थान कमिटीचे मानकरी, पदाधिकारी, सेवेकरी, चाकर नोकर, गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी, जीर्णोद्धार कमिटीचे मानकरी, पदाधिकारी उपस्थित होते