पालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने केले नियोजन
प्रतिनिधी/ सातारा
गणेशोत्सव अकरा दिवसांवर येवून ठेपला आहे. त्या अनुषंगाने सातारा पालिकेच्यावतीने सर्व नियोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्षा मनोज शेंडे यांच्यासह मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी येवू घातलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पारंपारिक पद्धतीने विसर्जन करण्याकरता व आगमन मिरवणूका यावर्षी नसल्या तरीही कोणतीही अडचण येवू नये यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या गेल्या आहेत. राधिका रोडवरील खोदलेल्या विसर्जन तळय़ांवर ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्याच्याही कार्यवाहीच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. तसेच प्रत्येक वॉर्डात हौद त्याचबरोबर हद्दवाढीतील भागातही छोटे छोटे पुंड ठेवण्यात येणार आहेत.
सातारा शहरात दरवर्षी गणेशोत्सवावेळी विसर्जनाचा मुद्दा ऐरणीवर येतो. परंतु गेल्या पाच वर्षापासून शहरातील प्रतापसिंह शेती शाळेच्या जागेत मोठय़ा गणेश मूर्ती विसर्जनाकरता मोठे तळे खोदले गेले आहे. तो प्रश्न मार्गी लागला गेला आहे. तीन वर्षापासून गणेशोत्सवावर नैसर्गिक व कोरोनाचे संकट असल्याने सातारा शहरात हा सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा होत आहे. गतवर्षी कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला. यावर्षीही साध्या पद्धतीने गणेशोत्सव गणेश मंडळे साजरा करणार आहेत. काही मंडळे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापनाच करणार नाही. तरीही पालिकेच्यावतीने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात आलेली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी नियोजन केले आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सातारा पालिकेच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सव मंडळांना सर्व सहकार्य केले जाते. परंतु गेल्या तीन वर्षापासून गणेशोत्सव काळात आलेली नैसर्गिक संकटे, कोरोंनाचे संकट यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने केला जात आहे. शहरात यापूर्वी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पालिका एक खिडकी योजना यासह विविध परवाने देते. परंतु गतवर्षीपासून कोरोनाच्या अनुषगाने मंडळांनीही जास्त डामडौल न करता अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. मूर्ती बसवली तर ती कमी उंचीच किंवा कायमस्वरुपी प्रतिष्ठापना करण्यात येते.
विसर्जनासाठी पालिकतेर्फ दिड लाखांची तरतूद
गणेशोत्सव अकरा दिवसावर येवून ठेपला असल्याने त्या अनुषंगाने विसर्जनाच्या दिवशी साहित्य लागणार असल्याने त्याकरता 1 लाख 48 हजार 220 रुपयांची तरतुद केली आहे. ते साहित्यही खरेदी करण्याकरता एका ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या विर्सजन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे ठेवण्यासाठी 2 लाख 95 हजार 920 रुपये, विसर्जन ठिकाणी लाईट, साऊंड सिस्टिम, जंनरेटरच्या भाडय़ासाठी 3 लाख 54 हजार 920 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रस्ते दुरुस्तीकरता आर्थिक व प्रशासकीय मान्यताही पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच विसर्जन तळय़ातील गाळ काढण्याच्या खर्चास पालिकेने मंजूरी दिली आहे. अशी सर्व तयारी पालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. कामालाही लवकरच प्रारंभ होणार आहे.
गणेशोत्सव मार्गावर कॅमेरे बसवण्यात येणार
विसर्जन मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, प्रत्येक मंडळाच्या मिरवणूकीवर लक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेच्यावतीने विसर्जन मार्गावर चौकाचौकात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. विसर्जन तळय़ाच्या ठिकाणी लायटींग करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व नियोजन करण्यात आलेले आहे.
सौ. माधवी कदम, नगराध्यक्षा
विसर्जनाची सोय करण्यात आली आहे
सातारा पालिकेच्यावतीने याही वर्षी विसर्जनची सोय करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे प्रतापसिंह शेती शाळेच्या तळय़ात मोठय़ा मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. हद्दवाढीच्या भागातल्यांकरता छोटे छोटे कुंड ठेवण्यात येणार आहेत.
मनोज शेंडे, उपनगराध्यक्ष
पालिका कुठेही कमी पडणार नाही
सातारा पालिकेच्यावतीने गणेशोत्सव शहरातील अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यकरता सर्व तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली आहे. विसर्जन तळी जी आहेत त्याच तळय़ात विसर्जन होणार आहे. प्रत्येक वॉर्डात पालिकेच्यावतीने छोटे छोटे हौदही ठेवण्यात येणार आहेत. पालिका कुठेही कमी पडणार नाही.
अभिजीत बापट,मुख्याधिकारी