बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सोमवारी कोविडची नवीन प्रकरणे हजारांपेक्षा कमी राहिली. तथापि, दैनंदिन चाचण्यांची संख्या देखील इतर दिवसांच्या तुलनेत कमी आहोत. राज्यात गेल्या २४ तासांत ९७३ नवीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. तर राज्यात १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी १,०७१ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सकारात्मकता दर ०.६९ टक्के होता तर केस मृत्यू दर १.७४ टक्के होता. राज्यात सध्या १७,३८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २९,५६,१३७ इतकी आहे. यापैकी २९,०१,२९९ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर राज्यात कोविडमुळे आतापर्यंत ३७,४२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.१४ टक्के आणि मृत्यू दर १.२६ टक्के आहे.
सोमवारी ९७३ रुग्णांपैकी २४३ रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात सापडले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १२, ३९, ७२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १२,१६,५११ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात ७,१८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविडमुळे एकूण १६,०३२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी सोमवारी आठ रुग्णांच्या मृत्यूंची पुष्टी झाली. बेंगळूरमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर ९८.१२ टक्के आहे. तर मृत्यू दर १.२९टक्के आहे.