प्रतिनिधी /फोंडा
अभिषेक बुक सेंटर, मुंबईचे भव्य पुस्तक विक्री प्रदर्शन वारखंडे-फोंडा येथील श्री हनुमान मंदिरच्या सभागृहात भरविण्यात आले आहे. इंग्रजी व मराठीतील नामंवत लेखकांची विविध विषयांवर हजारो पुस्तके सवलतीच्या दरात याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. पुढील काही दिवस सकाळी 10 ते रात्री 9 वा. यावेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखकांच्या कथा, कादंबऱयांसह निरनिराळय़ा विषयांवरील वैविद्यपूर्ण पुस्तके या प्रदर्शनात 15 ते 50 टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, माहितीपर, व्यवस्थापन यासह अन्य विषयावरील पुस्तकांचा त्यात समावेश आहे. वाचकांची निरंतर मागणी असलेल्या नामवंत लेखकांच्या पुस्तकांबरोबरच गेल्या दोन वर्षांमध्ये नव्याने प्रकाशित झालेली अनेक पुस्तकेही या प्रदर्शनात वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. इंग्रजी साहित्यातील जुन्या व नवीन पुस्तकांचा मोठा संग्रह हे या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ आहे. इंग्रजीतील अनेक नामवंत लेखकांच्या सदाकाळ वाचल्या जाणाऱया कथा कादंबऱया व इतर माहितीपर पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. याशिवाय विज्ञान व अन्य विषयावरील इंग्रजी पुस्तके किलोच्या दरात याठिकाणी मिळत आहेत. बालसाहित्य व विविध शाखांमध्ये अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी पुस्तकेही उपलब्ध आहेत.