बेळगाव : मजगाव येथे मंगळवारी महिला जागृती कार्यक्रम झाला. उद्यमबाग पोलिसांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम राबविण्यात आला. ब्रम्हदेव समुदाय भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात अधिकाऱयांनी महिलांना मार्गदर्शन केले.
उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, महिला पोलीस निरीक्षिका श्रीदेवी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे आदींसह उद्यमबागचे पोलीस उपनिरीक्षक आर. पी. कदम आदींनी मार्गदर्शन केले.
कौटुंबिक हिंसाचार, पोक्सो कायदा, मानवी तस्करी, सायबर क्राईम, बालमजूर कायदा व आर्थिक फसवणुकीसंबंधी महिलांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. मदतीसाठी 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही पोलीस अधिकाऱयांनी जनतेला केले आहे.