चाकूने 17 जणांवर केला वार – रेल्वेला लावली आग
वृत्तसंस्था / टोकियो
जपानची राजधानी टोकियोमध्ये एका व्यक्तीने धावत्या रेल्वेत लोकांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात 17 जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोराने बॅटमॅन कॉमिक्समधील विदूषकाच्या पात्राप्रमाणे पोशाख घातला होता. तसेच त्याने रेल्वेत आग देखील लावली आहे.
24 वर्षीय हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत आहे. आपण काही जणांचा जीव घेऊन मृत्युदंड इच्छित होतो असे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.
रेल्वेतून प्रवास करणारे लोक हॅलोवीन पाटर्य़ांसाठी शहराच्या विविध भागांमध्ये जात हेत. हल्लेखोरोने एका कॅरेजमध्ये कुठले तरी द्रव्य ओतून त्यात आग लावली होती. आगीपासून वाचण्यासाठी लोक रेल्वेच्या एका डब्यातून दुसऱया डब्यात पळत होते तसेच खिडकीतून उडी मारत होते.
विदूषकाच्या वेशातील व्यक्तीने रेल्वेत आग लावल्यावर प्रारंभी लोकांना हॅलोवीनचा स्टंट असल्याचे वाटले. पण त्यानंतर तो अन्य लोकांच्या दिशेने हातात चाकू घेऊन येऊ लागला होता. हा हल्ला टोकियोयच कोकूरयो स्थानकानजीक घडला आहे.
बॅटमॅन कॉमिक्समध्ये जोकर सुपर विलेन आणि बॅटमॅनचा सर्वात मोठा शत्रू आहे. 2019 मध्ये प्रदर्शित जोकर चित्रपटात शोषणाला कंटाळून एक व्यक्ती रेल्वेत काही लोकांवर गोळीबार करत असल्याचे दृश्य हेते.