प्रतिनिधी/ रत्नागिरी
शेतकऱयांचे कैवारी, ओबीसी समाजाचे तारणहार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा दौऱयावर असताना लांजा येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन संस्थेने केलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून कौतुक केले. तसेच पतसंस्थेच्या पुढील वाटचालीबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांच्याहस्ते नाना पटोले यांचे शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, संस्थेचे उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक नंदकुमार आंबेकर, गणेश जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे, संस्थेचे सर्व कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.