वार्ताहर / केपे
चंद्रकात कवळेकर यांनी भाजप तिकिटावर केपे मतदारसघांतून अर्ज दाखल केला असून या पुर्वी ते चार वेळा काँग्रेस पक्षावर केपे मतदार संघातून निवडून आले आहेत. यंदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे.
चंद्रकांत कवळेकर यांनी गोव्याचे नगर आणि देश नियोजन, कृषी, पुरातत्त्व, कारखाने आणि बॉयलर मंत्री म्हणून कार्यभार साभाळला आहे. तसेच ते गोवा विधानसभेचे चार वेळा सदस्य राहीले आहेत.