ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे ट्विटर अकाऊंट आज सकाळी हॅक करण्यात आले होते. अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने ‘सॉरी’ असं ट्विट केलं. त्यानंतर आणखी काही ट्विट करण्यात आले. ज्यामध्ये युक्रेनच्या मदतीसाठी दान करण्याचं आवाहन करण्यात आलं. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये रशियाच्या मदतीची याचना करत क्रिप्टोकरन्सीमधील देणग्या आता स्वीकारल्या जात आहेत, असे म्हटले होते.
दरम्यान, अकाऊंट हॅक झाल्यानंतर काही काळातच ते रिस्टोअर करण्यात आले. सर्व वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यात आले आहेत. त्यांच्या हँडलवरचं शेवटचं ट्विट आता 4 तासांपूर्वीचं आहे, ज्यामध्ये ते उत्तर प्रदेशच्या जनतेला 5 व्या टप्प्यातील मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. ”उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सर्व 61 जागांवरील मतदारांना आज माझे आवाहन आहे की, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि राज्यात मजबूत सरकार स्थापन करण्यात आपली भूमिका बजावली पाहिजे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांनी पुढे यावे,”