प्रतिनिधी / बेळगाव
कोरे गल्ली येथे पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी होळी साजरी करण्यात आली. या होळीचे वैशिष्टय़ म्हणजे येथे लाकडाचा वापर न करता शेणी आणि कापूर याचा वापर करून होळीचे दहन केले जाते. या कार्यक्रमासाठी गल्लीतील नागरिकांसह आसपासच्या भागातील नागरिक उपस्थित होते.
होळीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रमोद शहापूरकर, योगेश पेडणेकर, अक्षय पाटील, यश हंडे, प्रवीण शहापूरकर, गोकूळ पाटील, प्रशांत शहापूरकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी माजी महापौर महेश नाईक, मनोहर शहापूरकर, बंडू मजूकर, बंडू पाटील, महादेव सोमाजीचे, मोहन चिगरे, सुधीर नेसरीकर, भाऊ सावंत, सतिश गावडोजी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.