बोरिस जॉन्सन यांची नरेंद्र मोदींसमवेत द्विपक्षीय चर्चा : महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱया
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात शुक्रवारी महत्त्वाची द्विपक्षीय बैठक झाली. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक क्षेत्रात पुढे जाण्यावर सहमती झाली. दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे लढाऊ विमाने तयार करण्यासाठी ब्रिटन भारताला मदत करणार आहे. दोन्ही पंतप्रधानांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हवाई, अंतराळ आणि सागरी धोक्मयांचा सामना करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शवली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दोन दिवसांच्या भारत दौऱयावर आहेत. गुजरातमधून दिल्लीत पोहोचलेल्या जॉन्सन यांनी शुक्रवारी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याप्रसंगी दोन्ही देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. यादरम्यान भारत आणि ब्रिटनमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या आहेत. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉन्सन यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘खास मित्र’ असे संबोधले.
ब्रिटन संरक्षण खरेदीसाठी वितरणाचा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य निर्यात परवाना तयार करत आहे. भारत आणि ब्रिटनमधील भागिदारी अतिशय महत्त्वाची आहे. दोन्ही देशांनी आपापल्या पातळीवर द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचे काम केले आहे. तसेच हवाई, अंतराळ आणि सागरी धोक्मयांचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शवल्याची माहिती त्यांनी दिली. इंडो-पॅसिफिक प्रदेश मुक्त ठेवण्यासाठी दोन्ही देशांचे समान हित आहे. दोघेही इंडो-पॅसिफिकमध्ये नियमांवर आधारित वाहतुकीसाठी काम करण्यास सहमत आहेत. इतकेच नाही तर दोन्ही बाजू शाश्वत आणि देशांतर्गत ऊर्जेसाठी पावले उचलतील, असे बोरिस जॉन्सन म्हणाले.
‘सायबर’ आव्हानांशी एकत्रितपणे लढा
दोन्ही बाजूंनी सायबर क्षेत्रातील नवीन धोक्मयांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे. धोक्मयांना योग्य प्रतिसाद देण्यासाठी लढाऊ विमानांसाठी नवीन जेट तंत्रज्ञानासह ब्रिटन सागरी क्षेत्रातील भागिदारी मजबूत करेल. आम्ही नवीन आणि विस्तारित संरक्षण आणि सुरक्षा भागिदारीवर सहमत झालो आहोत. संरक्षण क्षेत्रातील ही भागिदारी पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ या घोषणेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे बोरिस जॉन्सन यांनी सांगितले.
‘एफटीए’ वर्षअखेरीस संपवण्याचा निर्णयः मोदी
गेल्या वषी आम्ही दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागिदारी स्थापन केली होती. या दशकात आमच्या संबंधांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही एक महत्त्वाकांक्षी रोडमॅप 2030 लाँच केला आहे. आज आम्ही या रोडमॅपचा पुन्हा एकदा अभ्यास करत भविष्यासाठी उद्दिष्टे निश्चित केली. आम्ही या वर्षाच्या अखेरीस एफटीए बंद करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. गेल्या काही महिन्यांत भारताने युएई आणि ऑस्ट्रेलियासोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. त्याच गतीने आणि वचनबद्धतेने भारत एफटीएप्रश्नी ब्रिटनसोबत पुढे जाऊ इच्छितो. आम्ही भारतात सुरू असलेल्या सर्वसमावेशक सुधारणा, आमची पायाभूत सुविधा आधुनिकीकरण योजना आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन याविषयीही चर्चा केली, असे स्पष्टीकरण पंतप्रधान मोदींनी दिले. ब्रिटनमधील कंपन्यांच्या भारतातील वाढत्या गुंतवणुकीचे भारत स्वागत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा
दोन्ही नेत्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावरही चर्चा केली. युपेनमध्ये तात्काळ युद्धबंदी आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर दिला असल्याचे मोदी म्हणाले. तसेच सर्व देशांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर करण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला.
विविध पैलूंनी ऐतिहासिक दौरा ः श्रृंगला
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दोन्ही देशांमधील चर्चा आणि करारांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉन्सन यांनी एफटीएच्या मुद्यावर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, रोजगार, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश आणि इतर तंत्रज्ञानावरही चर्चा केली. युपेनच्या मुद्यावरही चर्चा झाली असून भारताला युद्धविराम हवा आहे आणि हा वाद लवकरात लवकर सोडवावा असे मत व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकंदर विविध पैलूंनी जॉन्सन यांचा हा दौरा ऐतिहासिक ठरल्याचे ते पुढे म्हणाले.
लढाऊ विमानांच्या निर्मितीमध्ये
ब्रिटन करणार भारताला मदत
भारताची स्वतःची लढाऊ विमाने तयार करण्यासाठी ब्रिटन करणार भारताला मदत करणार असल्याबाबत सुतोवाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनुसार ब्रिटन भारताला स्वतःची लढाऊ विमाने कशी बनवायची आणि संरक्षण उपकरणांच्या जलद वितरणासाठी परवाना देणार आहे. नवीन भारतीय-डिझाईन केलेल्या आणि तयार केलेल्या लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी पाठिंबा देण्यासाठी आणि विमाने निर्मितीच्या सर्वोत्तम सुविधा देण्यावर द्वयींमध्ये शिक्कामोर्तब झाले.