दिनांक 01-05-2022 ते 7.5.2022
मेष
या आठवडय़ात असे बरेच प्रसंग येतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुम्ही चारही बाजूंनी अडकले गेलेले आहात. मार्ग दिसत नाही. असेही वाटू शकते की तुम्ही हतबल होत आहात. काही लोक तुमच्यावर टीका करतील. काही लोक तुमच्याविरुद्ध कारस्थाने करतील. पण वास्तवापेक्षा तुम्ही काळजी जास्त करत आहात हे लक्षात घ्या. आर्थिक आणि नात्यांच्या बाबतीमध्ये सावध राहण्याची गरज आहे. निळय़ा रंगाची काचेची गोटी जवळ ठेवा.
वृषभ
सर्वसाधारणपणे परिस्थिती चांगलीच आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र तुमच्या पाठीशी उभे आहेत. कोणी काहीही कारस्थान करत नाहेत हे लक्षात घ्या. पण तुम्ही तुमच्याच नादात असल्याने महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकते. व्यवसायात गुंतून घरातल्यांना वेळ न देणे यामुळे संबंध दुरावले जाऊ शकतात. आर्थिक बाबतीत आठवडा चांगला आहे.
पक्ष्यांकरता पाण्याची सोय करावी.
मिथुन
हा आठवडा जबाबदारी पूर्ण करण्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेनिशी लक्ष्य पूर्ण करण्याकरता प्रयत्न कराल. यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांची मदत घ्यावी लागू शकते. काही बाबतीमध्ये तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील. वेळेचा सदुपयोग व्हावा याकरता प्रयत्न करावा लागेल.
कस्तुरीचे अत्तर लावणे फायदेशीर ठरेल.
कर्क
आठवडय़ामध्ये तुम्ही गोड बोलून दुसऱयांकडून कामे करून घ्यावी. जिथे गुळाने काम होते तिथे गोळीचे काम नाही हे तुमचे ब्रीद वाक्मय असेल. कित्येक लोकांना तुमच्या सल्ल्याचा फायदा होईल. तुम्ही आखलेल्या योजनांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये मधुरता येईल. पैशाच्याबाबतीत आठवडा उत्तम आहे. एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या माध्यमातून फायदा होण्याची शक्मयता असेल.
हिरवा हातरुमाल जवळ ठेवावा.
सिंह
येणाऱया आठवडय़ामध्ये बऱयाच जबाबदाऱयांचा सामना करावा लागेल. काही गोष्टींबद्दल तुमचे मन तयार नसेल. काही अनावश्यक जबाबदाऱया डोक्मयावर पडल्याची जाणीव तुम्हाला होईल. संयम, नियोजन आणि सारासार विचार या गोष्टींची काळजी घेतली तर कुठलेही ध्येय अप्राप्य असणार नाही. आत्मविश्वासाच्या आणि ध्येयपूर्तीच्या नादात भावनिक संबंधांमध्ये मात्र दुर्लक्ष होऊ शकते.
काजळाची डबी जवळ ठेवावी.
कन्या
या आठवडय़ात तुम्हाला नियतीचा न्याय काय असतो याची जाणीव होईल. काही चुका ज्या पूर्वी घडून गेलेल्या आहेत त्याबद्दल कदाचित तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. कुठल्याही प्रकारची पळवाट यावेळेला वापरू नये. तुम्ही न केलेल्या गुह्यांचा आरोपही तुमच्यावर होऊ शकतो. अशावेळी डोके शांत ठेवून निर्णय घेणे योग्य ठरेल. भावनिक संबंधांमध्ये थोडा उणेपणाही येईल.
उगवत्या सूर्याला नमस्कार करावा.
तूळ
कठीण समय येता कोण कामास येतो याची जाणीव तुम्हाला या आठवडय़ामध्ये होईल. ज्यांना तुम्ही आपले म्हणता ती आपलीच माणसे तुमच्या गरजेच्यावेळी उपयोगी न पडल्याने तुमचे मन उदास असेल. काही छोटय़ा बाबतीत मिळालेले यश तुम्हाला सुखावून जाईल. पैसे जास्त खर्च झाल्याने आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्मयता आहे. स्वभावातील जास्त उदारता घातक ठरू शकते.
गर्दीच्या ठिकाणी पाण्याची सोय करावी.
वृश्चिक
या आठवडय़ात विचारातील गोंधळ आणि निर्णय करण्याच्या क्षमतेतील वैगुण्य यामुळे समोरील पर्यायांपैकी कशाची निवड करावी याचा बोध तुम्हाला होणार नाही. मानसिकता थोडी चलबिचल असू शकते. हा मानसिक गोंधळ वस्तूंच्या आणि व्यक्तींच्या बाबतीतही लागू पडतो. त्यामुळे डोळसपणे निर्णय घेणे योग्य ठरेल. आंधळा विश्वास करू नका.
मोकाट जनावरांसाठी खाण्यापिण्याची सोय करा.
धनु
तुमच्यातील क्षमतेचा किंवा तुमच्याकडे असलेल्या साधनांचा आणि संपत्तीचा योग्य वापर न केल्यामुळे हातात आलेल्या संधी निसटून जाण्याची शक्मयता आहे. तुमच्यातले कौशल्य, पैसा आणि संपत्ती चांगल्या कार्यात गुंतवल्यास अपेक्षेइतके यश मिळू शकते. या आठवडय़ात साठेबाजीकडे तुमचे मन असेल. पण त्यात धोकाही असू शकतो.
दिव्यांग व्यक्तीला होईल तशी मदत करा.
मकर
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीमुळे या आठवडय़ात तुमचे भावनाविश्व बदलू शकते. पैशांच्याबाबतीत व्यवहारीपणा येईल. काहीवेळा भावनेपेक्षा बुद्धीने निर्णय घेणे जास्त सयुक्तिक ठरेल. घरातील वडीलधाऱया व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. या आठवडय़ात अध्यात्माशी संबंधित व्यक्तीशी तुमची ओळख होऊ शकते. एकंदर हा आठवडा आर्थिक आणि भावनिकदृष्टय़ा चांगला आहे. मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला एखादी जीवनोपयोगी वस्तू भेट द्यावी.
कुंभ
या आठवडय़ामध्ये एकंदर तुमचा अनुभव असा असेल की जुने कर्तृत्व किंवा जुने दुःख या सगळय़ाला मोडीत घालून भविष्यात आमूलाग्र बदलाला सामोरे जायचे आहे. क्रांतिकारी बदलाबद्दल तुम्ही आशावादी असाल. हा बदल तब्येतीच्या बाबतीत किंवा आर्थिक बाबतीत किंवा भावनिक संबंधांच्या बाबतीमध्येही असू शकतो. ज्या नात्याला तुम्ही कंटाळला होता त्या नात्याला पूर्णविराम देण्याची वेळ आता आलेली आहे हे तुम्ही ओळखा. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित बदल होतील. भटक्मया कुत्र्यांना बिस्किटे घालावी.
मीन
तंत्रज्ञानाच्या संबंधात किंवा माहितीशी निगडित जर व्यवसाय करत असाल तर हा आठवडा आर्थिकदृष्टय़ा खूप चांगला जाईल. व्यापार-व्यवसाय यासंदर्भात नवीन बातमी किंवा संकेत मिळतील. या आठवडय़ात लोकांच्या संपर्कात तुम्ही जास्त असाल. एकंदर या आठवडय़ामध्ये माहितीविषयी देवाण-घेवाण जास्त असेल. तसेच याचा फायदा उचलणे योग्य ठरेल.
डाळिंबाची मुळी जवळ ठेवावी.
टॅरो उपाय ः पैशांचा चुंबकः बऱयाच वेळेला आपल्याला अचानकपणे काही रक्कम गरजेची असते. अशावेळी कंपास बॉक्सप्रमाणे लाकडाचा पिवळय़ा रंगाचा एक बॉक्स करून घ्यावा. त्यात तमालपत्र, 12 गोमती चक्र, 3 चुंबक, 1 डाळिंबाची कांडी, 5 रु.ची 5 नाणी, पाचशेच्या तीन नोटा (ज्यांचा नंबर विषम असेल) या सगळय़ा वस्तू घालाव्यात. बॉक्स चारही बाजूंनी पिवळय़ा धाग्याने बांधून टाकावा. हे सर्व करत असताना पूर्ण एकाग्र होऊन या बॉक्सला पैशांचा चुंबक या स्वरूपात बघावे. जेव्हा रक्कम गरजेची असेल तेव्हा एकाग्र होऊन हा बॉक्स वाजवावा.