वार्ताहर /माशेल
खांडोळा शासकीय महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाकडे जाणाऱया मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडे वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
या रस्त्यावरुन वाहनांची मोठय़ाप्रमाणात रहदारी असते. गवंडाळी पुलमार्गे पणजीकडे जाणारे प्रवासी याच मार्गाने जातात. शिवाय कॉलेज विद्यार्थी आपल्या दुचाक्या घेऊन नियमित ये जा करतात. या रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढल्याने समोरुन येणाऱया येणाऱया वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका कायम असतो. बोरीच्या झाडांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर झुकल्याने काटेरी फांद्या दुचाकी चालकांना त्यापासून धोका संभवत आहे. स्थानिक पंचायतीने किंवा संबंधीत खात्याने पावसाळय़ापूर्वी ही झाडे कापण गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.