प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षक दिनाचे औचित्य साधून जायंट्स प्राईड सहेलीतर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सीमा सोलापुरे, मंजुषा पाटील, व्ही. जी. कुलकर्णी या शिक्षिकांचा सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा, स्नेहल शहा, अशोक पोतदार, शिवाजी हंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरती शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सीमा सोलापुरे या गोमटेश पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख असून मागील 22 वर्षांपासून कॉलेजमध्ये सेवारत आहेत. मंजुषा पाटील या मराठी विद्यानिकेतन येथे गणित व विज्ञान विषय शिकवत असून, 17 वर्षांपासून ज्ञानदान करीत आहेत. व्ही. जी. कुलकर्णी या बालिका आदर्श विद्यालयात सेवा बजावत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली शहा यांनी केले. स्नेहल शहा यांनी आभार मानले. यावेळी शीतल जाधव, प्रियांका दोशी, निरुपमा शहा, पूजा पाटील, उषा मेहता, रूपा मंगावती, रिया सिंग, अश्विनी रोकडे यासह इतर सदस्य उपस्थित होते.