उमदी / वार्ताहर
जत तालुक्यातील उमदी येथील तरुण तुळजापूर येथून अंबाबाईची ज्योत घेऊन येत असताना पिकअपमधून तोल गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. करणाप्पा दर्याप्पा ऐवळे (वय.२२) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटक येथील हलसंगी फाट्यानजीक घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उमदी येथील तरुण दरवर्षी तुळजापूर येथून आंबामातेची ज्योत आणत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सगळे तरुण ज्योत आणण्यासाठी गेले होते. यात करणाप्पा ऐवळे या तरूणाचा समावेश होता. परंतु ज्योत घेऊन परत उमदीकडे येत असताना कर्नाटकातील हलसंगी फाटा नजीक पिकप मधून करणाप्पा याचा तोल गेला. पिकअपच्या चाकाखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.