शिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशच्या नव्या सरकारने नवीन वर्षात राज्यातील जनतेला धक्का दिला आहे. सुक्खू सरकारने डिझेलच्या किमतीवर व्हॅट वाढवला आहे. राज्यात व्हॅटमध्ये 3 रुपयांची वाढ केल्यानंतर आता डिझेलची किंमत 83.02 रुपये प्रति लिटरवरून थेट 86.05 रुपये प्रतिलिटर झाली आहे. यापूर्वी डिझेलवर प्रतिलिटर 4.40 रुपये व्हॅट होता. आता हा मूल्यवर्धित कर 7 रुपये 40 पैसे करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता शिमल्यात डिझेलची किंमतही 85.93 प्रतिलिटर झाली आहे. वाढीव दर 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या इंधन दरवाढीचा परिणाम फळे आणि भाज्यांच्या दरावरही दिसून येणार असल्याचे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे.