वार्ताहर /कणकुंबी
मलप्रभा नदी उगमस्थानावरील कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवरील कणकुंबी आणि चिगुळे येथील श्री माउलीदेवी आणि त्यांच्या भगिनी कोदाळी, गुळंब, कळसगादे, केंद्रे-वीजघर या सर्व देवींच्या भेटीचा सोहळा 14 वर्षांनी होत होत आहे. दि. 8 ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या यात्रोत्सवाला जवळपासच्या गोवा व महाराष्ट्र राज्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने देवस्थान कमिटी, पंचमंडळ, ग्रामस्थ व ग्राम पंचायतीने जोरदार तयारी केली आहे. बुधवार दि. 8, 9 व 10 असे तीन दिवस गावातील विविध मंदिरांचा धार्मिक विधी तर दि. 12 रोजी माउली देवींची भेट म्हणजे माउली यात्रोत्सव होणार आहे. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवातील दि. 11 रोजी कोदाळी, गुळंब, कळसगादे, केंद्रे-वीजघर या माउलीदेवी चिगुळे येथील श्री माउलीदेवीच्या भेटीसाठी मुक्कामाला येतात. तर दि. 12 रोजी या सर्व माउलीदेवी चिगुळे गावाहून कणकुंबी येथील माउलीदेवीच्या भेटीसाठी कणकुंबी-चिगुळे रस्त्यादरम्यान असलेल्या घुळीच्या वरं•ाकडे येतात, आणि त्या ठिकाणी सर्व माउलीदेवींच्या भेटीचा नयनरम्य सोहळा होतो. यात्रोत्सवात आठ दिवस अभिषेक व इतर धार्मिक विधी, महाप्रसाद, करमणुकीसाठी नाटक, पालखी सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम व पूजा अर्चा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. यात्रा कालावधीत दुकाने मांडण्यासाठी ट्रस्ट कमिटीने स्वतंत्र व्यवस्था केलेली असून परवानगीशिवाय दुकाने मांडता येणार नाहीत. भक्तांसाठी बेळगाव व खानापूर येथून स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून ग्रामपंचायतीनेसुद्धा मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी विशेष उपाययोजना केलेली आहे. यात्राकाळात कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील अनेक नामांकित व्यक्ती, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार असल्याचे बबनराव दळवी यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना सांगितले.
चिगुळे येथून जत्रोत्सवाला प्रारंभ
या यात्रोत्सवाची सुऊवात चिगुळे येथील माऊली मंदिराकडून होत असते दि. 11 रोजी महाराष्ट्रातील कोदाळी तसेच कळसगादे, गुळंब, केंद्रे या माऊली देवी पालखीतून लवाजम्यासहित चिगुळे गावच्या विषयी बाहेरील पटांगणावर येणार आहेत. या सर्व बहिणीची भेट धार्मिक विधी पूजाअर्चा व मानकरी यांच्या भेटी झाल्यानंतर दोन्ही पालक्मया बरोबरीने लवाजम्यासहित व भक्तगणांसह म्हातारी देवी मंदिराकडे भेट होते. तेथे काही वेळ बैठक व धार्मिक विधी झाल्यानंतर गाऱ्हाणे विधी होणार आहे. त्यानंतर वाजत गाजत गावच्या वेशीतून चिगुळे गावच्या चव्हाट्यावर बैठक होऊन मुख्य माऊली मंदिरपर्यंत मिरवणुकीने या सर्व देवता निघणार आहेत. चिगुळे माऊली मंदिरात धार्मिक विधी झाल्यानंतर माऊली भगिनींची एकत्र बैठक सोहळा, सुहासिनी महिला व इतर भक्तांकडून देवींच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम, नैवेद्य (बोणे) व देवदर्शन इत्यादी पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर रात्री 12 वाजता पारवाड येथील सातेरी केळबाई नाट्या मंडळाचा संत सांवतामाळी हा नाट्याप्रयोग चिगुळे येथील रंगमंचावर होणार आहे.