ओटवणे प्रतिनिधी
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा पुढाकार
तिरोडा येथील काशिनाथ गोडकर यांच्यावर गोवा बांबुळी रुग्णालयात तातडीच्या ह्रदय शस्त्रक्रियेसाठीबी पाॅझिटीव्ह रक्तगटाच्या आठ रक्तदात्यांची गरज होती. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे लक्ष वेधताच आठ रक्तदात्यांनी तात्काळ एकाच वेळी बांबुळी रुग्णालयात जात रक्तदान करीत रुग्णाचे प्राण वाचविले.काशिनाथ गोडकर यांना बी पाॅझिटीव्ह रक्तगटाची गरज असताना नातेवाईकांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे रक्तमित्र सदस्य तथा शिक्षक नेते राजू शेणई यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी बी पाॅझिटीव्ह रक्तगटाच्या आठ रक्तदात्यांची तात्काळ संपर्क साधुन नियोजन केले.यावेळी समीर नाईक (आरोंदा), रोशन आचरेकर (शिरोडा), ज्ञानदेव जोशी (नाणोस), रोशन राऊत (चेंदवण) या सर्वांनी तिसऱ्यांदा तर सच्चिदानंद पांढरे (आजगांव), गंगाराम जोशी (नाणोस), ओंकार गावडे व मयूर सावंत (दोघेही तिरोडा) यांनी दुसऱ्यांदा रक्तदान केले. यावेळी काशिनाथ गोडकर यांच्या नातेवाईकांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानसह राजू शेणई आणि या आठ रक्तदात्यांचे आभार मानले.