मेष
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी असा असेल. अपेक्षा नसताना काही कामे पूर्ण होतील तर जी कामे नक्की होणार असे वाटते त्यामध्ये अडथळे येतील. नोकरदार वर्गाला कामामध्ये थोड्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यापारी वर्गाला मध्यम स्वरूपाचा काळ आहे. प्रेमसंबंधांमध्ये मात्र कटूता येण्याची शक्मयता आहे.
गरजूला वस्त्र दान करा
वृषभ
या आठवड्यामध्ये तुम्ही मंगल कार्यात गुंतलेले असणार. मन प्रसन्न असेल. नवीन कपडे किंवा दागिन्यांची खरेदी कराल. कुटुंबासोबत छोट्या पिकनिकला जाऊ शकता. कामानिमित्त केलेल्या प्रवासामध्ये फायदा होईल. वैवाहिक जीवनातला आनंद कायम राखण्यासाठी तडजोड करावी लागेल.
तुळशीची पाच पाने जवळ ठेवावी
मिथुन
मध्यम फलदायी असा आठवडा असणार आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापासून दूर रहा. विशेषत: रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. काही कामे न झाल्याने चिडचिड होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहण्याची गरज आहे नाहीतर नुकसान होऊ शकते.
पक्ष्यांना दाणे घाला
कर्क
आत्मविश्वासात वाढ झाल्याने निर्णय घेण्यामध्ये अचूकता येईल आणि त्यामुळे बरीचशी कामे होतील. ज्यांना थोडेफार अपयश येईल असे वाटते त्यांना हार न मानण्याची आणि प्रयत्न करण्याची गरज आहे. नोकरदार वर्गाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नवीन कामे किंवा प्रोजेक्ट सुरू करण्याकरता योग्य वेळ आहे.
चंदनाचा टिळा लावावा
सिंह
शारीरिक आर्थिक आणि मानसिक दृष्टीने हा आठवडा उत्तम असेल. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याकरता अनुकूल काळ आहे. मनोरंजनाच्या उद्देशाने यात्रा करू शकाल. कामाच्या ठिकाणी इतर लोकांचे सहकार्य प्राप्त होईल. संततीकडून शुभ समाचार प्राप्त होण्याची शक्मयता आहे.
मोहरीच्या तेलाचे दान द्यावे
कन्या
आठवड्याचे फ़ळ उत्तम आहे. मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण उपभोगाल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यांना अनेक संधी प्राप्त होतील. एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा विचार कराल. मंगलकार्यात भाग घेऊ शकता. वैवाहिक जीवनातील गैरसमज दूर होईल.
दिव्यांग व्यक्तीला विनयपूर्वक अन्नदान करा
तूळ
आठवडा धार्मिक किंवा आध्यात्मिक कामाकरता उत्तम असेल. एखाद्या व्यक्तीशी पूर्वी भांडण झाले होते अशा व्यक्तीकडून आश्चर्यजन्यरित्या मदत प्राप्त होऊ शकते. जुना मित्रांची भेट होईल. आठवड्याच्या मध्यानंतर कामाचा व्याप वाढण्याची शक्मयता आहे त्यामुळे पूर्वनियोजन गरजेचे असेल.
लहान मुलांना आंबट गोड मिठाई वाटावी
वृश्चिक
आठवड्याची सुऊवात अत्याधिक व्यस्ततेने आणि काहीशा बेचैनीने होण्याची शक्मयता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या मर्जीने काम करावे. तब्येतीच्या बाबतीत बेपर्वा राहू नका. संततीकडून शुभ समाचार प्राप्त होईल. जे सिंगल आहेत त्यांना नवीन नात्याबद्दल आशा करायला हरकत नाही.
तेल दान द्यावे
धनु
जुनी येणी वसूल झाल्यामुळे किंवा आर्थिक प्राप्ती चांगली झाल्यामुळे आनंदी असाल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. मित्रांसोबत सहलीचे नियोजन करू शकता. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होईल. या आठवड्यात धोका असलेले कुठलेही काम हाती घेऊ नका, नुकसान होण्याची शक्मयता आहे. प्रेमसंबंध दृढ होतील. हळदीचा टिळा लावावा
मकर
आठवडा दगदगीचा असणार आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवावी. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. भावा-बहिणीमध्ये छोट्याशा कारणावरून भांडणाची वेळ येऊ शकते. वैवाहिक आयुष्यात चढ-उतार राहील. विद्यार्थ्यांनी कसून मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
मुक्या प्राण्यांची सेवा करावी
कुंभ
उत्तम फलदायी असा आठवडा असणार आहे. आरोग्याच्यादृष्टीने अनुकूल फळ आहे. मानसिक ताकत वाढल्याने अनेक निर्णय योग्य पद्धतीने घ्याल. घरात सुख समृद्धी येईल. नात्यांमध्ये गोडवा कायम असेल. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये थोडी कटुता येण्याची शक्मयता आहे.
सात प्रकारची धान्ये दान द्यावीत
मीन
मध्यम फलदायी असा आठवडा असणार आहे. बरीच कामे पूर्ण होतील पण अपेक्षित रिझल्ट मिळतीलच असे नाही. आर्थिकदृष्टीनेसुद्धा आठवडा सर्वसाधारण असेल. पुढे येणाऱ्या चांगल्या काळासाठी तयारी आत्ताच केलेली बरी. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर बोलत असताना शब्दांचा योग्य वापर करावा.
धार्मिक स्थळी अत्तराचे दान द्यावे
स्विच नंबर्स ही एक नवीन संकल्पना आज-काल बऱ्यापैकी जम बसवून आहे. अंकशास्त्र किंवा न्यूरोलॉजीप्रमाणे प्रत्येक अंक हा एका विशिष्ट ग्रहाला रिप्रेझेंट करतो. दोन हा अंक चंद्राचा, जो मानसिक ताकत देतो, एक हा सूर्याचा, जो अधिकार देतो, नऊ हा आकडा शेवटचा आणि परिपूर्ण मानला जातो. शून्य सगळ्या नंबर्सची ताकद वाढवतो. म्हणून हिरव्या किंवा लाल शाईने डाव्या हाताच्या अंगठ्याखाली 2190 हा आकडा लिहावा आणि वारंवार पहावा.