संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त
नांदोस चव्हाणवाडी,ता.मालवण येथील सुपुत्र असणारा तुषार दीपक पवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्याने संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त केली आहे. तुषार हा सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत या यशापर्यंत पोचला असून त्याचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदी विक्री संघात काम करतात तर आई घरी शिवणकाम करते.प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्याने ही मजल गाठली आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.तसेच चर्मकार समाज उन्नती मंडळाचे वतीने त्याचे विशेष कौतुक करण्यात आले.