प्रतिनिधी
बांदा
विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली चा एस एस सी चा निकाल 98.19 टक्के लागला प्रशालेतून 55 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यातील 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रतीक राजन गावकर याने 94 टक्के गुण मिळवींत प्रथम, प्राची गोविंद सावंत हिने 91 टक्के मिळवीत दृतीय व हर्ष आनंद राणे याने 89 टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे सरपंच तात्या वेंगुर्लेकर , अध्यक्ष अशोक सावंत, माजी अध्यक्ष बाळा गावडे, नारायण राणे , शिक्षक पालक संघ व मुख्याध्यापक सौ सुविद्या केरकर यांनी अभिनंदन केले.