सावंतवाडी:
सावंतवाडी-आंबोली मार्गावरील माडखोल-धवडकी येथे मंगळवारी रात्री तीन कार एकमेकांना आदळल्याने अपघात झाला. या अपघातात तिन्ही कारचे नुकसान झाले. एका कार चालकाला किरकोळ दुखापत झाली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली. घटनास्थळी सावंतवाडीचे पोलीस संजय कदम, प्रवीण काळसेकर यांनी पंचनामा केला. ओमनी कार सावंतवाडीतून गडहिंग्लजला जात होती. तर इंडिगो व इस्टीम कार कोल्हापूर येथून आंबोलीमार्गे गोव्याला जात होती. धवडकी येथे एका कार चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तिन्ही कार आदळल्या.