वन खात्याची कारवाई : सागवानासह भेंडीच्या लाकडचाही समावेश : लॉकडाऊनमध्येही माफिया कार्यरत
पेडणे / प्रतिनिधी
वन खात्याने गुरुवारी रात्री गवंडीवाडा – पार्से येथे केलेल्या कारवाईत अज्ञात व्यक्तीने भेंडीचे आणि सागवानाचे कापून ठेवलेले सुमारे दहा लाख रुपयांच्या किंमतीचे ओंडके जप्त केले आहेत. पेडणे वनखात्याची या काळातली ही मोठी कारवाई ठरली आहे. लॉकडाऊन असतानाही भेंडीच्या झाडाचे कापून ठेवलेले 172 तर सागवानाचे 30 पेक्षा जास्त ओंडके गवंडीवाडा पार्से येथील प्राथमिक शाळेच्या जवळील डोंगराळ भागात माफियानी लपवून ठेवले होते.
उत्तर गोवा उप वनपाल कुलदीप शर्मा यांच्या उपस्थितीत पेडणे वन क्षेत्र अधिकारी गौरेश बैलुटकर, वन अधिकारी अनिल केरकर, रवी शिरोडकर, वन रक्षक अरविंद व त्यांचे इतर सहकारी यांच्या उपस्थित ही कारवाई गुरूवारी संध्याकाळी उशिरा सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत सुरु होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाई
कुलदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर लाकूड चोरटय़ांनी कापून ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर पेडणे तालुका वन अधिकारी व त्यांच्या पथकाने पार्से येथे जाऊन डोंगराळ भागात शोध घेतला तेव्हा त्यांना लपवून ठेवलेले हे ओंडके सापडले. सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या जवळील डोंगरावर भेंडीच्या झाडाचे ओंडके सापडले. भेंडीच्या आणि सागवानाच्या मिळून ओंडक्मयाची बाजारभाव किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. लाकूड माफियाचा शोध वनखाते शोध घेत आहे.
पेडणे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात लाकूड माफिया
पेडणे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात लाकूड माफियांकडून झाडांची कत्तल होत आहे. सागवान, भेंडी, आंबा, फणस, किनळ आदी झाडे मोठय़ा प्रमाणात कापून त्यांच्या बेकायदा विक्रीच्या व्यवसायात लाकूड माफिया गुंतले आहेत. वन खात्यातील कर्मचारी तसेच अन्य संबंधित यंत्रणेला हाताशी धरून लाकूड माफिया कार्यरत असल्याची माहिती मिळाली. मोठय़ा प्रमाणात जंगली झाडे तसेच अन्य झाडे कापली जात असून या माफियांना सरकारी अधिकाऱयांचा वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तर गोवा वन विभाग भरारी पथक सक्रीय
उत्तर वन विभागाचे भरारी पथकाचे अधिकारी तुकाराम खर्बे हे महाराष्ट्र -गोवा सीमा भागात रात्री उशिरा तसेच पहाटे जाऊन पाहणी करतात. ते स्वतः सीमा भागात आडवाटा तसेच सीमा व ग्रामीण भागात जाऊन कानोसा घेत असून यापूर्वी लाकूड चोरीच्या गाडय़ा खर्बे यांनी पकडून संबंधित क्षेत्रातील अधिकाऱयांकडे दिल्या आहेत. पहाटे व संध्याकाळपासून ते सध्या पाहणी करत असतात.