प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील मिरकरवाडा बंदरात मच्छीमार तरूणाला मारहाण केल्याप्रकरणी 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तर एका संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आली आह़े मारहाणीच्या घटनेमुळे पारंपारिक मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिरकरवाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आह़े
एलियाज कुरेशी (ऱा मिरकरवाडा) असे मारहाणीत जखीम झालेल्या तरूणाचे नाव आह़े याप्रकरणी पोलिसांनी नासिर वाघू, नरू पटेल, जाबीर जीवीजी (ऱा सर्व मिरकरवाडा रत्नागिरी), मुकेश बिर्जे (मुरूगवाडा), प्रतिक मोंडकर (भगवतीबंदर) यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल केला आह़े
रत्नागिरी जिह्यात अवैध मासेमारी कशा प्रकारे सुरू आहे हे दाखवण्यासाठी मिरकरवाडा बंदरात अवैध बोटीतून मासळी उतरवल्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला आह़े हा व्हिडीओ मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, मत्सव्यवसाय आयुक्त राजीव जाधव, प्रादेशिक उपायुक्त देवरे यांना पाठवण्यात आला होत़ा तसेच कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होत़ी मिरकरवाडा बंदरात व्हिडिओ रेकॉर्डींग एलियाज कुरेशी याने काढल्याच्या संशयातून शनिवारी रात्री 11 च्या सुमारास कुरेशी याच्यावर हल्ला करण्यात आल़ा हे सर्व व्हिडिओ देवरे यांनी
पर्सिसीन मासेमारी करणाऱयाना पाठवले होते. त्यामुळे हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप पारंपारिक मच्छीमारांकडून करण्यात आला आह़े