क्रिसिलच्या अहवालातून स्पष्ट : 30 टक्क्मयांपर्यंत घसरण शक्मय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड 19चा प्रभाव जगातील सर्व क्षेत्रांमधील उलाढालीवर होत असल्याचे पहावयास मिळत आहे. काही निवडक क्षेत्रातील व्यवसाय सुरु आहेत तर अन्य व्यवसाय ठप्प पडले आहेत. यामध्ये आता चालू आर्थिक वर्षातील व्यवहारात सिमेंटची मागणी जवळपास 30 टक्क्मयांनी घसरण्याचा अंदाज बाजारपेठेतील संशोधक कंपनी क्रिसिल यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
देशातील तब्बल 13 राज्यांमधील मोठय़ा शहरांमधील सर्वेक्षणाचा आधार घेत सदरचा अहवाल तयार केला आहे. सिमेंटची विक्री करणारे डिलर्स, किरकोळ विक्रेते यांच्याकडून माहिती मिळवून अंदाज मांडला आहे. यासाठी जवळपास 93 टक्के डिलर्सनी म्हणणे मांडले आहे की, मे महिन्यात लॉकडाऊन काढून टाकण्याच्या स्थितीत सिमेंटच्या विक्रीत 10 ते 30 टक्क्मयांच्या आत घसरण होण्याचे मत मांडले आहे.
जोखीम घेण्यास नकार
एका बाजूला वरील समस्या असताना दुसरीकडे मात्र 70 ते 80 टक्के डिलर्स व्यक्तिगतपणे कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास टाळाटाळ करण्याची शक्मयता आहे. यात कामगारांची कमी संख्या आणि अर्थव्यवस्थेसह अन्य घडामोडींचा विचार करता नवीन उत्पादन होण्यास उशीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शिल्लक राहणारा सिमेंटचा साठा खराब होण्याची भीतीही डिलर्सच्या मनात आहेत.