मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने 70 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 70 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
सोलापूर शहरात सोमवारी 365 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 310 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 55 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 38 पुरुष तर 17 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6643 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 63932
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती 6643
प्राप्त तपासणी अहवाल 63932
प्रलंबित तपासणी अहवाल 00
निगेटिव्ह अहवाल 57289
एकूण मृतांची संख्या 412
उपचारात 782
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 5449