64वा वर्धापन दिन साजरा
प्रतिनिधी/ पणजी
भारतीय आयुर्विमा महामंडळ(एलआयसी), भारताची सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी, सेवेची64 समर्पित वर्षे पूर्ण करत आहे आणि लोकांचा विश्वास जिंकत आपली कामगिरी अशीच पुढे सुरु ठेवत आहे. या 64 वर्षांमध्ये, लोकांच्या कल्याणाची काळजी करत, देशाच्या कानाकोपऱयात’विमा’ चा प्रसार करण्यात एलआयसीने महत्वपूर्ण भूमिका बाजवली आहे. भारतीय विमा स्पर्धात्मक परिस्थितीत देखील एलआयसी ही प्रमुख आयुर्विमा कंपनी आहे. 31 मार्च2020 पर्यंत पॉलिसिमध्ये75.90ज्ञ् आणि पहिल्या वर्षाच्या प्रीमियममध्ये68.74ज्ञ् चा बाजार हिस्सा आहे.मार्च2020 अखेरपर्यंत, महामंडळाच्या नवीन व्यवसाय कामगिरीमध्ये1,77,977.07 कोटी रुपयांच्या उच्चा?की आकडय़ासह पहिल्या वर्षाच्या प्रीमियममध्ये25.17ज्ञ् वृद्धी दर्शविली आहे. निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्त व्यवसायाने1 लाख कोटींचा टप्पा पार करत नवीन इतिहास रचला आहे आणि मागील वषीच्या याच कालावधीतील90848.86 कोटी रुपयांच्या तुलनेत यावषी1,26,696.21कोटी रुपये नवीन व्यवसाय प्रीमियम उत्पन्न म्हणून संकलित करून39.46ज्ञ् टक्क्मयांची वृद्धी नोंदविली आहे. मार्च अखेर2020 पर्यंत महामंडळाने एकूण प्रीमियम उत्पन्नाच्या3,79,062.56 कोटी रुपये जमा केले, मागील वषी याच कालावधीत337185.40 कोटी रुपये जमा झाले होते यावषी यामध्ये12.42 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. 31 मार्च2020 अखेरीपर्यंत एकूण2,54,222.27कोटी रुपयांची पॉलिसि रक्कम जमा झाली आहे, मागील वषी याच कालावधीत2,50,936.23कोटी रुपये जमा झाले होते यावषी यामध्ये1.31 टक्क्मयांची वृद्धी निदर्शनालाआली आहे. 31 मार्च2020 अखेरपर्यंत महामंडळाच्या एकूण उत्पन्नात वाढ होऊन ते6,15,882.94कोटी रुपये झाले, मागील वषीच्या याच कालावधीतील5,60,784.39कोटी रुपयांच्या उत्पन्नात यावषी9.83 ज्ञ्ची वृद्धी झाली आहे. मागील वर्षातील याच कालावधीतील महामंडळाच्या31,11,847.28 कोटी रुपयांच्या एकूण मालमत्तेत2.71ज्ञ्ची वाढ होऊन ती यावषी31,96,214.81 कोटी रुपये इतकी झाली आहे.
राज्याचा विचार करता, 11 शाखा व3 उपग्रह कार्यालये असलेल्या एलआयसी गोवा विभागाने वर्ष2019-20 साठी217.05 कोटी रुपयांच्या प्रीमियमसह66897 विमा(पॉलिसी)पूर्ण केल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात, 25 ऑगस्ट2020 पर्यंत आम्ही एकूण प्रीमियम उत्पन्नाच्या112.64 कोटी रुपयांसह12761 नवीन विमा प्राप्त केल्या असून28.19 ज्ञ् सह पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नाच्या वृद्धी दारामध्ये गोवा विभाग संपूर्ण भारतात दुसऱया क्रमांकावर आहे. गोवा विभागात एकूण3845 एजंट असून त्यातील52 मिलियन डॉलर्स राउंड टेबल, 16 करोडपती आणि112 शतकवीर एजंटआहेत. यामध्ये विविध संवर्गात108 विकास अधिकारी आणि439 प्रशासकीय कर्मचारी आहेत. गेल्या आर्थिक वर्षात गोवा विभागाने विम्याच्या कालावधी पूर्ण झालेली103314 आणि531.43 कोटी रुपयांहून अधिक उत्तरजीविता लाभ प्रकरणे निकाली काढली आहेत तसेच36.35 कोटी रुपयांचे2874 मृत्यू दावे निकाली काढले आहेत. सध्या गोवा विभाग11.40 लाखांहून अधिक विमा धारकांना सेवा देत आहे.
एलआयसीने केवळ विम्याच्या स्वरूपातच लोकांच्या आयुष्यात हातभार लावला आहे असे नाही तर पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूकीसह असंख्य राष्ट्र उभारणी प्रकल्पांमध्ये देखील महत्वाची भूमिका बजावली आहे ज्यामध्ये वीज, गृहनिर्माण क्षेत्र, पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रकल्प, रस्ते विकास, पूल आणि रस्ते वाहतूक आहे. एलआयसीने पॉलिसीधारकांना विलंब शुल्कामध्ये आकर्षक सवलत देत10 ऑगस्ट2020 ते9 ऑक्टोबर2020 या कालावधीत त्यांची बंद झालेली पॉलिसी पुनरुज्जीवित करण्याची एक विलक्षण संधी जाहीर केली आहे.ज्यांना काही अपरिहार्य कारणांमुळे प्रीमियम भरणे शक्मय झाले नव्हते आणि त्यामुळे त्यांची पॉलिसि बंद झाली होती अशा विमा धारकांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. विमा संरक्षण पुनर्संचयित करण्यासाठी जुन्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करणे नेहमीच चांगले होते. एलआयसी साठी त्याचे विमा धारक आणि त्यांचे जीवन विमा संरक्षण सुरू ठेवणे नेहमीच महत्वपूर्ण राहिले आहे. ही मोहीम एलआयसीच्या विमा धारकांना त्यांचा विमा पुनरुज्जीवित करण्याची आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जीवन कवच पुनर्संचयित करण्याची चांगली संधी आहे. एलआयसीने आपली नवीन एलआयसीएस जीवन अक्षयन्घ्घ् (प्लॅन नं. 7857) सादर केला आहे ज्यात सिंगल प्रीमियम, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट आहे.विमा धारकांना एकरकमी रकमेच्या देयकासाठी10 उपलब्ध पर्यायांमधून एक प्रकार निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 30 ते85 वयोगटासाठी ही विमा उपलब्ध आहे. विम्याचा सुरुवातीलाच वार्षिक दरांची हमी दिलेली असते आणि विमा धारकाल संपूर्ण कालावधीत ही रक्कम देय असते. ही योजना ऑफलाइन तसेच ऑनलाईन देखील खरेदी केली जाऊ शकते.